आढळराव पाटील : तळेगाव ढमढेरेत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
तळेगाव ढमढेरे – शिरूर तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिरूर तालुक्यात रचनात्मक विकासाचे मॉडेल उभे करणार आहे. तसेच तालुक्यात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही. प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथे 4 कोटी 87 लाख रुपयांच्या मुख्यमंत्री ग्रामसडक अंतर्गत योजनेतील तळेगाव ढमढेरे ते पाटेठाण रस्त्याचा भूमिपूजन समारंभ आढळराव पाटील यांच्या हस्ते पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल, किसान मोर्चा प्रदेश सचिव जयेश शिंदे, शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ सासवडे,
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, अनिल काशीद, बापूसाहेब शिंदे, सरपंच अंकिता भुजबळ, शिरूर तालुका भाजपा उपाध्यक्ष संदीप ढमढेरे, रघुनंदन गवारी, आरपीआय अध्यक्ष नवनाथ कांबळे, कैलास सोनवणे, माजी तलाठी संघटना अध्यक्ष कैलास नरके, माजी उपसरपंच राहुल भुजबळ, मनोज आल्हाट, आप्पासाहेब बेनके, आप्पा धुमाळ, अमोल वर्पे, शेतकरी संघटनेचे राजेंद्र ढमढेरे, डॉ. राजेंद्र ढमढेरे, मंगेश चौधरी, मानसिंग ढमढेरे, सरपंच राहुल गव्हाणे,
अॅड .सुरेश भुजबळ, प्रशांत गायकवाड, अर्जुन तोडकर, किरण शिंदे, संदीप गवारे, दत्ता गिलबिले, गणेश कोतवाल, दत्ता दरेकर, भरत भुजबळ, प्रकाश जगताप, सतीश जगताप, सूर्यकांत भोसुरे, बाबूपाटील ढमढेरे, पोपटभाऊ जगताप, सागर ढमढेरे, हरिभाऊ ढमढेरे, अमित ढमढेरे, अतुल ढमढेरे, बाळुकाका चौधरी, माधव चौधरी, विजय घुले,अण्णा हजारे,
विजय चौधरी, सुनील ढमढेरे, दीपक वाकचौरे, अमोल भोसले, मारुती चोरमले, अजिंक्य ढमढेरे, रजनीकांत भुजबळ, किरण ढमढेरे, तात्यासाहेब चोरमले, संभाजी चोरमले, रामदास चोरमले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयेश शिंदे यांनी, सुधीर ढमढेरे यांनी तर प्रशांत चौधरी यांनी आभार मानले.
आमदारांनी श्रेय घेऊ नये
शेतकर्यांकडून वर्षानुवर्षे मागणी होत होती. तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून या रस्त्याच्या कामाची मागणी केली होती आणि रस्त्याचा विषय मार्गी लागला होता. उगाच आमदार अशोक पवार यांनी या कामाचे खोटे श्रेय घेऊ नये, असा टोला शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लगावला.