मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे सामान्यांपासून सेलिब्रिटींची लाइफस्टाइल बदलली आहे. असाच बदल अभिनेत्री सोनम कपूरमध्ये झालेला दिसतो आहे. सोनमने इंस्टाग्रामवर पोस्ट करून सांगितले की, तिचे संपूर्ण कुटुंब पुस्तके वाचण्यात दंग झाली आहेत. पुस्तक वाचून सध्याच्या वेळेचा सदुपयोग करण्याचेही तिने चाहत्यांना सांगितले आहे.
तिने पुस्तकांची लिस्ट देऊन चाहत्यांना यापासून प्रेरणा मिळेल, असे सांगितले आहे.
सोनमने इंस्टाग्रामवर सांगितले की, ती सध्या लेखक टेरी ओ ब्रायन यांचे “50 ग्रेटेस्ट शॉर्ट स्टोरिज्’ हे पुस्तक वाचत आहे. सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर माजी पोलीस अधिकारी राकेश मारिया यांचे “लेट मी से इट नाऊ’ हे पुस्तक वाचत आहे.
View this post on Instagram
या पोस्टमध्ये सोनमने सांगितले की तिचे पती आनंद आहूजा लेखक देवदत्त पटनायक यांचे “माय गीता’ हे पुस्तक वाचत आहे. सोनमची बहीण रिया कपूर लेखिका अप्रैल ब्लूम फील्ड यांचे “ए गर्ल ऍन्ड हर ग्रीन्स ः हर्टी मिल्स फ्रॉम द गार्डन’ हे पुस्तक वाचत आहे. सोनमची सासू “द सिक्रेट’ हे पुस्तक वाचत आहे. तर तिचे सासरेही अनेक पुस्तके वाचत आहे.