नवी दिल्ली – ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’च्या गुवाहाटी शाखेने एका वेगळ्या प्रकारच्या कापसाच्या जातीचा शोध लावला आहे. हा कापूस पाण्याचे शोषण न करता तेलाचे शोषण करणारा आहे. त्यामुळे समुद्रात जेव्हा तेल सांडते तेव्हा हा कापूस उपयुक्त ठरणार आहे.
समुद्रात किंवा नद्यांमध्ये होणारी कोणत्या प्रकारची तेलगळती समुद्रातील पाण्यासाठी हानिकारक असते. पाण्यात मिसळलेले तेल बाजूला करणे अतिशय कष्टाचे काम असते पण आता आयआयटी गुवाहाटी च्या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे या कापसाच्या नवीन जाती मध्ये फक्त तेलच शोषले जात असल्यामुळे पाण्यात मिसळले तेल बाजूला करणे शक्य होणार आहे.
ही नवीन जात विकसित करणे अतिशय स्वस्त असून ते रिसायकल करणे ही शक्य आहे. अतिशय पातळ किंवा जाडसर तेल शोधण्याचे कामही हा कापूस करू शकतो. चुकीच्या कालावधीमध्ये जर चुकून तेलगळती झाली. तर या कापसाचा वापर करून पाण्यापासून तेल वेगळे करणे शक्य होणार आहे.
आयटी गोहाटीचे प्रोफेसर शाम विश्वास यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे…. भारतासारख्या मोठ्या देशामध्ये नेहमीच समुद्रमार्गे तेलाची वाहतूक केली जाते आणि या कालावधीमध्ये तेलगळती होण्याचे प्रमाण नेहमीच जास्त असते.
त्याचा मोठा फटका समुद्रातील जीवांना बसतो मुद्राच्या आसपास असणाऱ्या पक्षांना जर या तेलाचा त्रास झाला तर त्यांना उडता येणेही शक्य होत नाही. त्या शिवाय मासे आणि इतर जीवांना ही या तेलाचा त्रास होतो.
आणि समुद्राच्या किंवा नदीच्या पाण्यात विरघळलेले तेल सहसा व्यवस्थितपणे बाजूला करणे शक्य नसते. पण आता या कापसाचा वापर करून ही प्रक्रिया करणे एक शक्य होणार आहे.