पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. 16) जाहीर झाला. करोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शाळा म्हणाव्या तशा भरल्याच नाहीत.
ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर लक्ष ठेवले. ही पद्धत तशी रूढ नाही; पण विद्यार्थ्यांनीही या कठीण प्रसंगात आपले कौशल्य पणाला लावून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि यावर्षीच्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
आंबेगाव तालुक्यातील 54 शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. महात्मा गांधी विद्यालय – मंचर, जनता विद्या मंदिर – घोडेगाव, हुतात्मा बाबु गेणु विद्यालय – महाळुंगे पडवळ, श्री भैरवनाथ विद्यालय – अवसरी खुर्द, शिवाजी विद्यालय – धामणी,
भीमाशंकर विद्यालय – शिनोली, विद्या विकास मंदिर – अवसरी बुद्रुक, श्री मुक्तादेवी विद्यालय – नारोडी, श्री भैरवनाथ विद्यालय – लोणी, नरसिंह विद्यालय – रांजणी, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय – निरगुडसर, श्री वाकेश्वर विद्यालय – पेठ, श्रीराम विद्यालय – पिंपळगांव खडकी, शिवशंकर विद्यालय – आंबेगाव, कमलजादेवी विद्यालय – कळंब,
संगमेश्वर विद्यालय- पारगाव, संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय – चास, शासकीय प्राथमिक आश्रम शाळा – गोहे बुद्रुक, श्री भैरवनाथ विद्यालय – शिंगवे, जगदिशचंद्र महिंद्रा हायस्कूल – चिंचोली,शासकीय प्राथमिक आश्रम शाळा – तेरुंगण, श्री पंढरीनाथ विद्यालय – पोखरी, सोमनाथ विठ्ठल नवले विद्यालय – भावडी, श्री नवखंड माध्यमिक विद्यालय –
पारगाव तर्फे खेड, हनुमान विद्यालय – गंगापुर बुद्रुक, श्री शिवाजीराव दत्तात्रय आढळराव पाटील विद्यालय – लांडेवाडी चिंचोडी, भैरवनाथ विद्यालय – गिरवली, सहकार महर्षी डी. जी. वळसे पाटील विद्यालय – आंबेगाव, कृष्णा यशवंत भालचिम माध्यमिक विद्यालय – माळीण, न्यु इंग्लिश स्कुल जांभोरी, डॉ. मुमताज अहमदखान उर्दु हायस्कुल – मंचर, श्री मुक्ताई प्रशाळा –
पिंपळगाव घोडे, श्री हरिश्चंद्र सीताराम तोत्रे विद्यालय – कुरवंडी, माध्यमिक विद्यालय – पोंदेवाडी, लाल बहादुर शास्त्री विद्यालय – आमोंडी, न्यु इंग्लिश स्कुल – बोरघर, माध्यमिक विद्यालय – खडक वाडी, श्रीरंग व्ही. गभाले मराठी विद्यालय – मोहरेवाडी, शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय – डिंभे, काळभैरवनाथ व सौ.लक्ष्मीबाई बांगर विद्यालय –
खडकी, हिरकणी विद्यालय – गावडेवाडी, शासकीय आश्रमशाळा – असाणे, आदर्श माध्यमिक विद्यालय – जारकरवाडी, यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय – आंबेगाव वसाहत, वनेश्वर माध्यमिक विद्यालय – तिरपाड, प्रगती विद्यालय – वडगाव पीर, न्यु इंग्लिश स्कुल –
गोहे खुर्द, न्यु इंग्लिश स्कुल – लाखणगाव, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा – राजपूर, शासकीय आश्रमशाळा – आहुपे, श्री. एन. एम. नंदकर आश्रमशाळा – फुलवडे, न्यु इंग्लिश मीडियम स्कुल – घोडेगाव, अनुसूचित जाती नवबौद्ध – पेठ, शासकीय इंग्रजी माध्यमिक शाळा इत्यादी शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
143 पैकी 140 शाळांचा निकाल 100 टक्के
थेऊर, दि. 17 (वार्ताहर) -महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये हवेली तालुक्यातील 143 पैकी 140 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
यामध्ये उरूळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालय (99.80 टक्के), लोणीकंद येथील डॉ. बसू विद्याधाम (99.23 टक्के) व महम्मदवाडी येथील डॉ. दादा गुजर विद्यालय (99.69 टक्के) या तीन शाळा वगळता इतर सर्व 140 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
उत्तीर्ण झालेल्या 13 हजार 628 विद्यार्थ्यांपैकी 4 हजार 185 विद्यार्थ्यांनी प्राविण्य श्रेणी, 6 हजार 8 जणांनी प्रथम श्रेणी 3 हजार 263 विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी मिळवली आहे.