आलिया भटच्या एका गाण्यावर 3 कोटींचा खर्च

बाहुबली फेम एसएस राजामौली सध्या आपल्या “आरआरआर’ या आगामी सिनेमासाठी चर्चेत आहेत. काही तरी भव्यदिव्य करण्याकडे राजामौली यांचा नेहमीच कल असतो. त्याचप्रमाणे त्यांनी “आरआरआर’मध्येही काही भव्यदिव्य करायला सुरुवात केली आहे. या सिनेमाचे शूटिंग जवळपास पूर्ण व्हायला आले आहे. आलिया भट आणि रामचरण यांच्यावर चित्रित होणाऱ्या एका गाण्यावर राजामौलींनी निर्मात्यांना पाण्यासारखा पैसा खर्च करायला लावले आहे.

या गाण्यावर निर्माते तब्बल 3 कोटी रुपये खर्च करणार असल्याचे समजले. या गाण्याच्या शूटिंगसाठी आलिया भट या महिन्यात हैदराबादमध्ये पोहोचणार आहे. गाण्यासाठी रामोजी फिल्मसिटीमध्ये विशाल सेट उभारला जाणार आहे. याची भव्यता प्रत्यक्ष पडद्यावर अधिकच भव्य दिसणार आहे. “आरआरआर’ दसऱ्याच्या मुहुर्तावर रिलीज करण्याचे नियोजन आहे. 13 ऑक्‍टोबरला सिनेमा रिलीज करावा असे आता तरी ठरवले आहे.

मात्र, अजून थिएटर सुरू होण्याची घोषणा झालेली नाही. पण ती लवकरच होईल अशी शक्‍यता आहे. “आरआरआर’मध्ये आलियाबरोबर अजय देवगणदेखील आहे. या सिनेमातील आणखी काही आश्‍चर्यकारक तथ्ये लवकरच समजतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.