नगर -सतत वर्षभर विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या अथक प्रयत्नांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आल्याने रयत शिक्षण संस्थेच्या येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पूर्व उच्चप्राथमिक 5वी व पूर्व माध्यमिक 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश संपादन केल्याची माहिती मुख्याध्यापक सुभाष ठुबे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांतील पात्र विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत विद्यालयातील 5 वी तील 4 तर 8 वी तील एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. इ.5 वीतील अद्वैत गहाणडुले याने 244 गुणांसह शहर गुणवत्ता यादीत 22 वे, आश्लेषा गहाणडुले हिने 236 गुणांसह 48 वे, मयूर पवार याने 236 गुणांसह 49 वे तर उदय वनवे याने 204 गुणांसह 240 वे स्थान प्राप्त केले.
याच बरोबर 8 वी तील विद्यार्थी अभिषेक शिरसाठ याने शहर गुणवत्ता यादीत 49 वा क्रमांक प्राप्त केला. मुख्याध्यापक शिवाजी लंके यांच्या सुयोग्य नियोजनाखाली विभागप्रमुख व्ही.वाय.धामणे, एस.एस.झावरे, एन.बी.कातोरे, टी.एम.आढाव, राजेंद्र देवकर, प्रदीप पालवे, महादेव भद्रे आदी शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे यश संपादन केले.