MP Elections 2023 – मध्य प्रदेशातील धार येथे जन आक्रोश यात्रेला संबोधित करताना प्रियांका गांधी वाड्रा यांनी भाजपवर जहरी टीका केली. प्रियांका गांधी म्हणाल्या की, ‘मध्य प्रदेशात सर्वत्र घोटाळे होत आहे. भारतीय जनता पक्षाने महाकालेश्वर ज्योतिर्लिंग उज्जैन येथील ‘महाकाल’ बाबाही सोडले नाही. आता हे सरकार बदलण्याची वेळ आली आहे.’
पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, ‘आजकाल पंतप्रधान शिवराज सिंह यांचे मोदी नाव घ्यायला लाजतात, पण काँग्रेसचे नाव पंच्याऐंशी वेळा घेतात. माझा त्यांना सल्ला आहे की, त्यांनी कधी कधी ‘विकास’ हे नावही घ्यावे.’
भाजपवर निशाणा साधत प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘येथे व्यापम घोटाळा झाला, ज्यामध्ये ५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला पण त्याची चौकशी झाली नाही. त्याचबरोबर त्यांच्या विरोधात कोणी काही बोलले किंवा लिहिल्यास ईडी लगेच त्यांच्या घरी पोहोचते. ईडी चित्रपट कलाकारांच्या घरीही पोहोचते. ईडी भष्ट्र भाजप अधिकारी आणि नेत्यांच्या घरी का पोहोचत नाही? असा सवालही प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.
प्रियंका यांनी भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका पुढे म्हणाल्या की, ‘जे आज निवडणूकीत मोठमोठी आश्वासने देत आहे. वर्षानुवर्षे लुटल्यानंतर त्यांना गॅस सिलिंडरची किंमत आठवली. 18 वर्षांनंतर त्यांना बहिणींची आठवण आली, मग 18 वर्षे कुठे गायब होते ? भाजप सरकारने त्यांना मदत न केल्यामुळे मध्य प्रदेशातील पटवारी महिनाभरापासून संपावर आहेत. आपली महत्त्वाची कामे करून घेण्यासाठी लोकांची भटकंती सुरू आहे. आमच्या काँग्रेस सरकारांनी पंचायतींना अधिकार देऊन हा अधिकार आणखी मजबूत केला. मात्र आज भाजप सरपंचांचे हक्क डावलत आहे. आम्हाला आमच्या देशाचा अभिमान आहे. इथे प्रत्येक व्यक्तीला समान हक्क मिळायला हवा. मी मध्य प्रदेशातील तरुणांना निवडणुकीत काय होणार आहे, असे विचारले असता ते म्हणाले, ‘राजा जात आहे’, यावेळी आम्ही रोजगारासाठी मतदान करू.’ असं म्हणत प्रचारादरम्यान गांधी यांनी भाजपवर चौफेर टीका केली.