Aditya Thackeray News – भाजप नेते शिवसेना ठाकरे गटाचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना नेहमीच टीका करतांना पेंग्विन असे बोलतात. यावरून आज माध्यमांशी बोलतांना आदित्य ठाकरे यांनी भाजप नेत्यांना प्रतिउत्तर दिल आहे. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले,’ भाजप नेते मला नेहमी बेबी पेंग्विन म्हणतात पण पेंग्विनने किती उत्पन्न दिले तेही बघा. पेंग्विन बघायला लोक गर्दी करत आहेत. तिकडे जाऊन बघा की पेंग्विन बघायला गर्दी आहे की चित्ता बघायला गर्दी आहे. फरक सर्वांना माहिती आहे.’ असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.
ते पुढे म्हणाले,’मला पेंग्विन म्हणतात तर म्हणू द्या. मला त्याचा आनंद आहे. मागच्या 7 वर्षांत पेंग्विनकडून मिळालेलं उत्पन्न बघा. महानगरपालिकेला 50 खोके मिळवून दिले आहेत. मी तर पेंग्विनसारखा चालत नाही. या सरकारमध्ये पेंग्विनसारखं कोण चालतं ते मला माहित नाही.’ असा टोलाही आदित्य ठाकरेंनी लगावला.