सेंच्युरियन : फिलँडर आणि रबाडाच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पहिल्या डावात १८१ धावांवर रोखत १०३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुस-यादिवसअखेर दुस-या डावात द.आफ्रिकेने ४ बाद ७२ धावा करत एकूण १७५ धावांची आघाडी घेतली आहे. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऐनरिक नाॅर्टजे ४ आणि रैसी वैन डर डुसेन १७ धावांवर खेळत होता.
Stumps – day 2 | SA: 72-4
The umpires have decided to call it a day.
After a fantastic effort the ball the Proteas have struggled to capitalize with the bat
🏏Van der Dussen 17*
🏏 Nortje 4*
The Proteas lead by 175 runs going into the 3rd day of play.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/LiabesZY9L
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 27, 2019
दुस-या डावात आफ्रिकेची सुरूवात चांगली झाली नाही. अवघ्या १४.४ षटकात ६२ धावांवर त्याचे ४ फलंदाज माघारी परतले. यामध्ये एडेन मार्करम २, डीन एल्गर २२, जुबैर हमजा ४ आणि फाफ डू प्लेसी २० धावांवर बाद झाले. इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने २ आणि जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्राॅडने प्रत्येकी १ गडी बाद केला.
du Plessis has been dismissed | SA: 62-4
Proteas lose their 4th wicket of the session.
du Plessis is out, caught at deep square by Sam Curran.
The lead is up to 165 runs, and a night watch man has been sent in.#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/EtlUWD20PG
— Proteas Men (@ProteasMenCSA) December 27, 2019
तत्पूर्वी, कालच्या ९ बाद २७७ धावसंख्येवरून पुढे खेळताना आफ्रिकेला आज ७ धावांचीच भर घालता आली. आफ्रिकेची शेवटची विकेट जोफ्रा आर्चरच्या रूपात पडली आणि त्याचा पहिला डाव २८४ वर संपुष्टात आला. पहिल्या डावात आफ्रिकेकडून क्विटंन डी काॅकने सर्वाधिक ९५ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात इंग्लंडची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर राॅरी बर्न्स ९ आणि डोमनिक सिबली ४ धावावर बाद झाले तेव्हा इंग्लंडची स्थिती ५ षटकात २ बाद १५ अशी झाली होती. त्यानंतर जो डेनलीने ५०, जो रूटने २९, बेन स्टोक्सने ३५, सॅम करनने २० आणि बटलरने १२ धावा केल्या. इतर फलंदाजांना मात्र दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही आणि इंग्लंडचा पहिला डाव १८१ वर आटोपला.
14.2-8-16-4
Test cricket will miss Vernon Philander 😢 #SAvENG pic.twitter.com/Rrx8RVQr8s
— ICC (@ICC) December 27, 2019
दक्षिण आफ्रिकेडून वरनाॅन फिलँडरने १६ धावांत ४, कगिसो रबाडाने ६८ धावांत ३, ऐनरिक नाॅर्टजेने ४७ धावांत २ आणि ड्वेन प्रीटोरियसने २३ धावांत १ गडी बाद केला.