‘मोदी उदया ‘आरएसएस’ला ही नकली म्हणतील’ उद्धव ठाकरेंचा पलटवार

Lok Sabha Election 2024 । देशातील लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातील मतदान २० मेला पार पडणार आहे. त्यासाठी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत सभा घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना नकली शिवसेना म्हणत टीका केली. या टीकेवर आज इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली.
उद्धव ठाकरे म्हणाले,’महाराष्ट्राची लूट केली जात आहे, राज्याला बदनाम केलं जातंय. शासकीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय. भाजपकडून भ्रष्टाचाऱ्यांचा सन्मान केला जातो अशी टीका त्यांनी केली. तोडा, फोडा आणि राज्य करा यावर भाजपचा भर आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.
ते पुढे म्हणाले,’एक दिवस भाजप संघाला देखील संपवेल… आणि मोदी उदयाला आरएसएसला ही नकली म्हणतील’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींवर पलटवार केला आहे.
उद्धव ठाकरेंनी पुढे संदर्भ देत सांगितले,’आजच्या एका वृत्तपत्रात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नडडा यांची मुलाखत छापून आली आहे. त्यात त्यांनी म्हटलं की सुरूवातीला भारतीय जनता पक्ष हा कमी ताकदवान होता, आम्हाला संघाची गरज होती. पण आता आम्ही सक्षम आहोत. हे पाहता आता संघाला नष्ट करतील असं दिसतंय. हे १००वं वर्ष संघासाठी धोक्याच ठरेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजप एककल्ली कारभार देशात सुरू ठेवेल. ही हुकूमशाहीची सुरूवात आहे.’अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.
हे वाचाल का ? ‘सिलिंडर वाले लोक आता ‘सरेंडर’ करत आहेत…’, अखिलेश यादवांनी स्मृती इराणींवर साधला ‘निशाणा’





