‘बेटी बचाओ, बेटी पढावो’,मात्र योगी सरकारचा या उलटच कारभार

नवी दिल्ली  – उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचा( बुधवारी दि . ३० सप्टेंबर ) दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  या घटनेमुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्‍त होऊ लागली आहे.

दरम्यान , राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या सामूहिक बलात्कार प्रकरणावरून उत्तर प्रदेशमधील योगी सरकारवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढावो अभियानाच्या अगदी विरोधात कारभार सुरू आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, बेटी बचाओ, बेटी पढावो, या केंद्र सरकारच्या मोहिमेच्या अगदी उलट कारभार उत्तर प्रदेशात सुरु आहे. हाथरस येथील घटनेनंतर बलरामपूर येथे सामूहिक बलात्कार व हत्येची आणखी एक घटना उजेडात आली. हे कधी थांबणार आहे? असा संताप सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. तसेच या अमानुष घटना थांबविण्यासाठी कठोर कायदे करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून कठोर कायदे करण्याची व ते राबविण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी मांडले.

तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.