अनुराग कश्यप चौकशीसाठी वर्सोवा पोलिस स्थानकात दाखल

मुंबई – चित्रपट निर्माते अनुराग कश्‍यप यांच्यावर अभिनेत्री पायल घोष हिच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला  होता. कश्‍यप यांनी मात्र हा आरोप धुडकावून लावला होता. काही दिवसांपूर्वी वर्सोवा पोलीस ठाण्यात जाऊन पायलने ही तक्रार दाखल केली होती.  तर यातच  बुधवारी  मुंबई पोलिसांकडून अनुराग कश्यप याला चौकशीसाठी समन्स पाठविण्यात आले  होते.


यातच मिळालेल्या माहितीनुसार, अनुराग कश्यप  आज (1 ऑक्टोबर) वर्सोवा पोलिस स्थानकात हजर झाला आहे. तो आज सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलिस स्थानकात दाखल झाला असून, त्याला यासंबंधी प्रश्नोत्तरे केली जाणार आहेत.

दरम्यान, पायलच्या तक्रारीनुसार पोलिसांनी कश्‍यप यांच्या विरोधात कलम 376 (1) बलात्कार, 354 विनयभंग व जबरदस्ती, 341, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा वर्सोवा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी  अभिनेत्री पायल घोषने काही दिवसांपूर्वी   राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेऊन निवेदन दिले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.