पुणे – बंद घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे.
माहितीनुसार, उजवी भुसारी कॉलनीमध्ये चार बिल्डिंगमध्ये चोरीची घटना घडली आहे. पहाटे ३ च्या सुमारास चार ते पाच चोर चारचाकीमधून आले होते. जवळपास ५ ते ७ फ्लॅटचे कुलूप तोडून ही चोरी करण्यात आली. यानंतर एका बिल्डिंगमधील वाॅचमनने हटकल्याने चोर पळून गेले.
दरम्यान, पुढील तपास पोलीस करत आहेत.