कैरो – भारताचा दिग्गज नेमबाज सौरभ चौधरीने कैरो येथील आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात देशाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. 19 वर्षीय सौरभने जर्मनीच्या माइकल श्वॉल्डचा 16-3 असा पराभव करत सुवर्ण वेध घेतला. तर रशियाच्या आर्टेम चेरनोसोव्हने कांस्यपदक पटकावले.
भारतीय ऑलिम्पियन सौरभने एकूण 584 गुणांसह तिसरे स्थान मिळवले आणि पहिल्या 8 नेमबाजांपैकी एक म्हणून उपांत्य फेरीत प्रवेश केला. यानंतर उपांत्य फेरीत तो अव्वल ठरला.
दुसरीकडे 10 मीटर एअर रायफल प्रकारात भारताच्या श्रेया अग्रवालचे उपांत्य फेरीतील स्थान थोडक्यात हुकले. श्रेयाने एकूण 629.3 गुण नोंदवले, जे हंगेरीच्या एस्स्टर मेस्झारोसपेक्षा 0.1 कमी होते.