रियाध – जागतिक फुटबॉलमधील बलाढ्य मानल्या जात असलेल्या अर्जेंटिनाला यंदाच्या विश्वकरंडक ( FIFA WorldCup ) स्पर्धेत सलामीलाच पराभूत करणाऱ्या सौदी अरेबियाच्या खेळाडूंचे नशीब उजळले आहे. या विजयाची भेट म्हणून त्यांच्या राजघराण्याचे सुलतान महंमद बिन सलमान यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला जगातील सर्वात महागडी रोल्स रॉइस कार देण्याचे जाहीर केले आहे.
“संयम व धैर्य आईकडूनच शिकलो”, पुण्यातील कार्यक्रमात राहुल द्रविड यांचे गौरवोद्गार
सौदीच्या संघाने 0-1 अशा पिछाडीवरून अर्जेंटिनाचा 2-1 असा पराभव करत ऐतिहाकिस कामगिरी केली होती. तसेच अशी कामगिरी करणारा पहिलाच आशियाई संघ ही ओळखही निर्माण केली होती. सौदीच्या या विजयानंतर लगेचच देशात सार्वजनिक सुट्टीही जाहीर करण्यात आली होती. आता या संघातील प्रत्येक खेळाडूला तब्बल पाच लाख युरो किमतीची ही कार भेट देण्यात येणार आहे.
“संयम व धैर्य आईकडूनच शिकलो”, पुण्यातील कार्यक्रमात राहुल द्रविड यांचे गौरवोद्गार
अर्थात सौदीच्या राजघराण्यातील एखाद्या व्यक्तीने आपल्या देशाच्या फुटबॉल संघातील खेळाडूंना भेट देण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वी 1994 सालच्या विश्वकरंडक फुटबॉल ( FIFA WorldCup ) स्पर्धेत सौदीने बेल्जियमवर 1-0 असा विजय मिळवल्यावर त्यांचा स्टार खेळाडू व या विजयाचा शिल्पकार सईद अल ओवैरान याला रोल्स रॉइस कार भेट देण्यात आली होती.