कडूस, (वार्ताहर) – भैरवनाथ महाराजांच्या उत्सवाचे आकर्षण ठरलेल्या बैलगाडा शर्यतीत 150 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला. यामध्ये मंगेश सातकर यांच्या गाड्याने घाटाचा राजा हा बहूमान मिळविला.
बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांकात 21बैलगाडे, दुसर्या क्रमांकात25 बैलगाडे ,तिसर्या क्रमांकात24बैलगाडे आणि चौथ्या क्रमांकात 12 बैलगाडे पळाले. प्रथम शंकर ज्ञानेश्वर गारगोटे यांचा गाडा फळीफोड ठरला. दुसरा मोन्या साळुंखे यांचा बैलगाडा, तिसरा लक्ष्मण गोपाळे यांचा बैलगाडा तर चौथा विशाल पारधी यांचा बैलगाडा फळीफोड किताबाचा मानकरी ठरला.
दुसरा क्रमांक वैभव दत्तात्रय ढमाले ,अक्षय मोढवे पंचवटी ग्रुप कडूस व नयन ढमाले ,सचिन शिंदे व मंगेश सातकर यांच्या जुगलबंदी गाड्यांनी पटकावला. तिसरा क्रमांक ज्ञानेश्वर कुलाठ, रामहरी कणसे जातेगाव आणि काळोबा बैलगाडा संघटनाऔढे यांच्या गाड्यांनी पटकावला. चौथा क्रमांक शंकर गारगोटे, विठ्ठल ढमाले,निवृत्ती नेहरे यांच्या गाड्यांनी पटकावला.
फायनल शर्यतीचा इनाम विभागून देण्यात आला. यामध्ये पंडित मोढवे, शुभम खळदकर मैत्री ग्रुप कडूस व गजानन धायबर सह्याद्री ग्रुप ढमाले शिवार यांनी सामुहिकरीत्या प्रथम क्रमांक पटकावला.वैभव दत्तात्रय ढमाले अक्षय मोढवे पंचवटी ग्रुप व नयन, सचिन शिंदे व मंगेश सातकर यांच्या जुगलबंदी बैलगाड्याने दुसरा क्रमांक पटकावला.
श्री भैरवनाथ महाराज यात्रेची सांगता रविवारी (दि. 14) मोठ्या उत्साहात झाली. स्व.अशोक शेंडे कुस्ती संकुलात कुस्त्यांच्या आखाड्यात पुणे जिल्ह्याच्या मावळ पट्ट्यातील तसेच भोसरी, देहू खेड व परिसरातील नामवंत मल्लांनी हजेरी लावली होती.आखाड्यात तरूण मुलींनीही लाल मातीत कुस्ती खेळातील विविध डाव दाखवून वाहवा मिळविली. दुपारी कुस्त्यांचा आखाडा सुरू होऊन संध्याकाळी मोठ्या रकमेची शेवटची कुस्ती बरोबरीत सुटली.