उपाध्यक्षपदी एकनाथ वाघमोडे; खजिनदारपदी नवनाथ भिसे
दहिवडी – दहिवडी शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दै. पुण्यनगरीचे माण तालुका प्रतिनिधी पत्रकार उमेश बुधावले यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली.तर उपाध्यक्षपदी दै. महाराष्ट्र न्यूजचे पत्रकार एकनाथ वाघमोडे यांची आणि खजिनदारपदी दैनिक सत्य सह्याद्रीचे पत्रकार नवनाथ भिसे यांची निवड करण्यात आली.
दहिवडी शहर पत्रकार संघाचे संस्थापक पत्रकार लालासाहेब दडस यांच्या मार्गदर्शनाखाली दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. यावेळी मागील वर्षाच्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास दाखवत त्यांच्या फेरनिवडी आणि नवीन निवडीचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी दै. सकाळचे पत्रकार रुपेश कदम, दै. लोकमतचे पत्रकार नवनाथ जगदाळे, दै. पुढारीचे पत्रकार आणि माण चौफेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ, दै. नवराष्ट्रचे पत्रकार दौलत नाईक, दै. पुण्यनगरीचे पत्रकार अभिजित अवघडे, माणदेश माझा युट्यूब चॅनेलचे संपादक लिंगराज साखरे,
आपला आवाज न्यूज नेटवर्कचे संपादक संदीप जठार, दै. सकाळचे गोंदवले प्रतिनिधी फिरोज तांबोळी यांच्यासह दहिवडी नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष धनाजी जाधव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.