कराड – कराड शहर पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील अमित हणमंत कदम सध्या (रा. होली फॅमिलीच्या मागे, वैभव कॉलनी, विद्यानगर, मूळ रा. अंतवडी, ता. कराड) व शेखर उर्फ बाळू प्रकाश सूर्यवंशी (रा. हजारमाची, ता. कराड) यांना जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.
या दोघांच्या गुन्हेगारी कारवाया मोडीत काढण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी कराड पोलिसांनी हद्दपार प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावावर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी सुनावणी घेऊन दोघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश दिला.