पुणेकरांनो काळजी घ्या! पुण्यात 7,010 नवे बाधित

59 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू ः ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या पोहोचली 48 हजार 939 वर

पुणे – पुणे शहरात चोवीस तासांत तब्बल 7 हजार 10 नवीन करोना रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे मिनी लॉकडाऊनला विरोध होत असताना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले असून, बेड मिळवण्यासाठी रुग्णालये तसेच होलसेल मेडिकलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांच्या रांगा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात गुरुवारीही विक्रमी रुग्ण आढळले असून, चोवीस तासांत बरे झालेल्या तब्बल 4 हजार 99 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला आहे. तर, पुण्याबाहेरील 16 रुग्णांसह तब्बल 59 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने शहरातील परिस्थिती भयावह झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शहरात आतापर्यंत 3 लाख 12 हजार 382 करोना बाधित आढळले असून, त्यापैकी 2 लाख 57 हजार 833 रुग्ण बरेही झाले आहेत, तर 5 हजार 610 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शहरातील ऍक्‍टिव्ह रुग्णसंख्या 48 हजार 939 झाली आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत 23 हजार 595 संशयितांची स्वॅब टेस्ट करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.