सातारा – महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप कराटे राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नुकतीच वसई मुंबई येथे पार पडली. अत्यंत वेगवान अवघड समजल्या जाणाऱ्या कराटेसारखे स्पर्धेत त्रिशा योगेश जाधव सुवर्णपदक मिळवत जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
सहा वर्षीय त्रिशाला तिच्या पालकांनी गेल्या वर्षभरापासून कराटे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मीडियम स्कूल सदरबझार सातारा येते ती शिक्षण घेते. तिच्या यशात प्रशिक्षक उमेश राठोड, वडिल योगेश जाधव, आई अमृता जाधव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे योगदान लाभले.
त्रिशा योगेश जाधवचे मूळ गाव शेरेवाडी (ढवळ) फलटण असून त्रिशाने सुवर्णपदक पटकावले आहे. तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आई, वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने कराटे स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळविले आहे.