पुसेगाव – जातीजाती, धर्मामध्ये तेढ करून आणणे आणि मते घेणे हे काही लोकांना शक्य होते. तो या जातीचा तो या जातीचा असले राजकारण आम्ही कधीच करीत नाही, या देशावर या भूमीवर जो प्रेम करतो तो जातीचा राजकारण करीत नाही. आम्ही सर्वत्रिक जात मानून तरुणांची संघटना उभी केली आहे. या तरुण संघटनेच्या माध्यमातून मुले पुढे जाऊ लागली आहेत. गोरगरिबांसाठी काम करू लागली आहेत. माझ्या गावातील गरीब आहे. त्याला मदत केली पाहिजे, त्यावर लक्ष दिले पाहिजे, असे आमदार महेश शिंदे यांनी सांगितले.
वर्धनगड (ता. खटाव) येथे विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी आमदार महेश शिंदे बोलत होते. यावेळी खटाव उत्तरच्या कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेच्या 55 कोटी पाणी योजनेचे काम, जलजीवन मिशन वर्धनगड, एक कोटी 99 लाख रुपये वर्धनगड येथे त्रिमिक्स काँक्रिटीकरणाच्या व बंदिस्त गटार करणे यासाठी 55 लाख रुपये, पाचंगणेअळी येथील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे 42 लाख रुपये,
मुस्लिम दफन भूमी रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे वीस लाख रुपये, पाचंगणे अळी येथे ट्रिमिक्स काँक्रीटकरण व पूल बांधणे 15 लाख रुपये, पाचंगणे अळी येते नाईक समाजासाठी स्मशानभूमीसाठी दहा लाख रुपये या कामाचा उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, खटाव उतरला 55 कोटीच्या माध्यमातून कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेचे काम 38 टक्के पूर्ण झाले असून उर्वरीत 62 टक्के काम तीन महिन्यांच्या आत पूर्ण करणार आहे. वर्धनगड येथील विविध कामासाठी आणखी निधीची गरज भासल्यास कितीही निधी देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार शशिकांत शिंदे वर बोलताना आमदार महेश शिंदे म्हणाले, गावात कामे येऊन सुद्धा ठराव न देणे, येणारी कामे हाणून पाडणे हे असले राजकारण बंद करावे अन्यथा पुन्हा एकदा लोक जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत.
प्रास्ताविकामध्ये प्रा. सावंत यांनी गावाच्या विविध विकास कामाबद्दल माहिती दिली. वर्धनगड महेश शिंदे युवा मंच कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार महेश शिंदे व उपस्थित मान्यवरांचे श्रीफळ, शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. आमदार महेश शिंदे यांनी येथील मुस्लिम समाजाचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले. सूत्रसंचालन रोहन पाचांगणे यांनी केले.
यावेळी गारवडीचे माजी सरपंच शिवाजी शेडगे, पुसेगाव उपसरपंच पृथ्वीराज जाधव, अमोल घाडगे, वैभव आवळे, विनोद घाडगे, हरिश्चंद्र सावंत, शिरढोण सरपंच संदीप साळुंखे, पवारवाडी सरपंच महेश पवार, अजय मदने, संजय घोरपडे, शिवाजी पाचांगणे, उमेश चव्हाण, अर्जुन कुंभार, फिरोज सय्यद, असलम शिकलगार, अक्षय मोहिते, आयुब शिकलगार, शमशुद्दीन शेख, सुलतान भालदार उपस्थित होते.