म्हसवड (प्रतिनिधी) – माण तालुक्यातील हवालदारवाडी-कासारवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्यात ग्रामस्थांनी अखेरच्या क्षणी यश मिळविले.
माण तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेत टंचाईमुक्त केलेल्या या गावात सलोखा टिकवण्यासाठी सात सदस्यसंख्येची ग्रामपंचायत बिनविरोध व्हावी यासाठी ग्रामस्थांनी प्रयत्न केले. हवालदारवाडीतील प्रत्येक वार्डात प्रत्येकी एक याप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु कासारवाडीतील वॉर्डात बिनविरोध सदस्य निवडण्यात अडचण होती.
हे निदर्शनास येताच दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थांनी बैठक घेऊन कासारवाडीतील वॉर्डात भरलेले उमेदवारी अर्ज काढून घेण्यास व तेथील निवडणूकही बिनविरोध करण्यात अखेर यश मिळविले. लगतच असलेल्या भाटकी, इंजबावपाठोपाठ हवालदारवाडी-कासारवाडी ग्रामपंचायत निवडणूकही बिनविरोध करण्यात यश आले आहे. याबाबतची औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे.
ही निवडणूक बिनविरोध करण्यास रंग कामगार सेनेचे धनाजीराव सावंत, हनुमंत गायकवाड, हरिभाऊ सावंर्तं, महादू सावंत, गणपू सावंत, नवनाथ मास्तर, बाबुराव सावंत, ज्ञानेश्वर गायकवाड, सुरेश गायकवाड, गोपाळ सावंत, नाना गायकवाड, संतोष जगदाळे, ब्रह्मदेव काटकर, निशिकांत जितकर,काकासाहेब धनवडे, नंदकुमार धनवडे, चिंटा धनवडे, पोपटराव फरतडे, नारायण जितकर यांनी परिश्रम घेतले.