वॉशिंग्टन – अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेन्टेटीव्हच्या सभापतीपदी नॅन्सी पेलोसी यांची आज लागोपाठ चौथ्यांदा निवड झाली आहे. 80 वर्षीय पेलोसी यांना 216 मते मिळाली तर त्यांच्या विरोधीतील रिपब्लीकन पक्षाचे उमेदवार केवीन मॅकार्थी यांना 209 मते मिळाली.
अगदी अल्प आघाडींनी त्यांना हे यश मिळाले आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे सभागृहात एकूण 222 सदस्य आहेत पण त्यातील सहा जणांनी पेलोसी यांना मतदान केले नाही. अमेरिकेच्या संसदेचे हे सभागृह 435 जणांचे आहे.
दरम्यान, आपल्या विजयाबद्दल पेलोसी यांनी मतदार सदस्यांचे आभार मानताना देशातील करोना आव्हानाचा यशस्वीपणे मुकाबला करणे ही आपल्यापुढील सर्वात मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेली सतरा वर्ष त्या सभापतीपदावर कार्यरत आहेत.