सातारा – विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा २०२३- २४ या स्पर्धेचे यजमानपद सांगली जिल्ह्याकडे असून या स्पर्धा दि. १९ ते २१ जानेवारी यादरम्यान सांगली येथे होणार आहेत. सांस्कृतिक स्पर्धा तसेच मैदानी स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातील सुमारे शंभर खेळाडू गुरुवारी सांगलीकडे रवाना झाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी या स्पर्धेसाठी महसूल कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी तहसीलदार (महसूल) शशिकांत जाधव, नायब तहसीलदार महेश उबारे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देविदास ताम्हाणे, नायब तहसीलदार सुनील शेटे उपस्थित होते.
याच स्पर्धेत गेल्या आठवड्यात झालेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये सातारा जिल्ह्याने क्रिकेटमध्ये उपविजेतेपद पटकावले. सातारचे प्रांताधिकारी सुधाकर भोसले, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मनोहर गव्हाड, तहसीलदार (पुनर्वसन) अमरजीत वाकडे आणि इतर खेळाडूंनी क्रिकेट खेळात सहभाग नोंदवला होता.