सातारा शहर पोलिसांची धडक कारवाई
सातारा: संचारबंदी असतानाही रस्त्यावर बिनकामी मोटरसायकल घेऊन येरझाऱ्या मारणाऱ्या वीज जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात दुचाकी स्वरावर गुन्हे दाखल करण्याची ही पहिलीच वेळ आहे. संचार बंदीच्या काळात घराबाहेर पडू नका असे पोलीस वारंवार आवाहन करत आहेत मात्र तरीसुद्धा अनेक जण दुचाकी घेऊन घराबाहेर पडत आहेत अशा लोकांवर पोलिसांनी दुचाकी जप्त करण्याचा सपाटा लावला होता. मात्र आता केवळ दुचाकी जप्त न करता गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे.
सातारा शहर पोलिसांनी बुधवारी रात्री दहा वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक आणि सातारा शहर पोलीस ठाण्यासमोर वाहने अडवली. यावेळी रस्त्यावर बिनकामी फिरणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवून त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने पोलिसांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला. अशा 20 जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यामुळे दुचाकी स्वरांमध्ये खळबळ उडाली आहे.
सद्दाम मेहबूब अन्सारी, संदीप गजानन टोणपे, सागर नारायण सोनवणे, आदित्य येवले, श्रीनाथ टंकसाळे, सुरज पंडित, सुभाष शिरसागर, हर्षद बागवान, विनोद जाधव, अझर मोमीन, प्रकाश पार्टे, लक्ष्मण बारटक्के, रफिक मुजावर, निलेश नलावडे इमरान खान, संजय टोकरे, विष्णु शिंदे, शशिकांत विभुते, तुषार जाधव, महेश दोंडे सर्व राहणार सातारा शहर व परिसर या वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.