पुसेसावळी – भारतीय जनता पार्टी रहिमतपूर मंडल युवा मोर्चा अध्यक्षपदी श्रीकांत पिसाळ यांची निवड करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार जयकुमार गोरे, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा रहिमतपूर मंडल अध्यक्ष भीमराव पाटील यांनी कराड-उत्तर विधानसभा मंडलातील निवडी नुकत्याच जाहीर केल्या. त्यामध्ये श्रीकांत पिसाळ यांना जबाबदारी देण्यात आली.
यावेळी भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, रहिमतपूर नगरपालिकेचे विरोधीपक्ष नेते निलेश माने, माजी जि. प. सदस्य सागर शिवदास, के एम शुगरचे संचालक विक्रम घोरपडे, गणेश घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या निवडीनंतर श्रीकांत पिसाळ म्हणाले, भाजपा पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे,तसेच कराड-उत्तर विधानसभा मतदारसंघांमधील रहिमतपुर मंडलातील येणाऱ्या गावांमध्ये भाजपा पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी माजी चेअरमन विजय पिसाळ, सचिन पिसाळ फौजी, माजी सोसायटी सदस्य विलास पिसाळ, भाजपा रहिमतपूर मंडल वाहतूक विभाग अध्यक्ष मच्छिंद्रनाथ पिसाळ, संजय अवघडे,चंद्रकांत पिसाळ,अक्षय घाटगे, दिनकर पिसाळ, आण्णासो साळुंखे, वामन अवघडे, प्रशांत पिसाळ, अशोक पिसाळ, श्रीकांत पिसाळ, अण्णासो पिसाळ, संभाजी कुंभार, संजय चव्हाण, अभिजित पिसाळ, सुनील पिसाळ, दादासो जानकर आदिसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.