सातारा, (प्रतिनधी)- जिल्हा ॲम्युचर ॲथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत वार्षिक वरिष्ठ गट मैदानी स्पर्धा कराड येथील वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये दि. 21 व 22 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहेत. या स्पर्धेत जिल्ह्यातील सोळा वर्षावरील खेळाडू सहभागी होऊ शकतात.
या स्पर्धेतून नागपूर येथे 1 ते 3 जून दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ गट राज्य मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड केली जाणार आहे. स्पर्धेत 100 मीटर, 200 मीटर, 400 मीटर, 800 मीटर, 1500 मीटर, 5000 मीटर, 10000 मीटर धावणे, त्याचबरोबर उडीफेक आणि अडथळ्यांची शर्यत हे क्रीडा प्रकार होणार आहेत.
या स्पर्धेतील सहभागासाठी खेळाडूंनी19 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत https://forms.gle/x9Ctf56pdQ97oiWn7 या लिंकवर जाऊन नावनोंदणी करावी. त्यानंतर पाठवलेल्या एन्ट्रीचा विचार केला जाणार नाही. प्रत्येक खेळाडूला वैयक्तिक दोन क्रीडा प्रकारांत भाग घेता येईल. या स्पर्धेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी केले आहे.