एकूण रुग्णसंख्या ६४९ , जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांची माहिती…
सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात २८ जणांचे करोना पाँझिटिव्ह आले. रात्री उशिरा १८ तर सकाळी १० जण पाँझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६४९ झाली आहे. जिल्हयातील 16 ते 78 वयोगटातील 8 महिला व 10 पुरुष अशा 18 जणांचे रिपोर्ट कोराना बाधित आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. अमोद गडीकर यांनी दिली.
या कोरोनाबाधितांची तालुकानिहाय व गावनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे….
कोरेगाव तालुक्यातील गिघेवाडी येथील 5.
वाई तालुक्यातील व्याजवाडी येथील 1, पाचवड येथील 1, बोरीव – 1
जावळी तालुक्यातील भणंग येथील 1, धोंडेवाडी येथील 1, पिंपळवाड येथील 1
खटाव तालुक्यातील वडगाव येथील 1, पळसगाव येथील 1
महाबळेश्वर तालुक्यातील दाभेकर येथील 1
माण तालुक्यातील वडजल येथील 3, भालवडी येथील 1