सातारा – येथील सुहाना सफर ग्रुपतर्फे शनिवार, दि. 30 रोजी सायंकाळी 5.30 वाजता सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्या गीतावर आधारित ‘जब धरती नग्मे गाएगी’ ही बहारदार गीतांची मैफिल पाठक हॉल सातारा येथे होणार आहे.
या गीत मैफिल कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन क्लबचे प्रमुख विजय साबळे यांनी केले असून या सदाबहार गीत मैफिलीमध्ये शिरीष खुटाळे, डॉ. सुनील पटवर्धन, सचिन शेरकर, चंद्रशेखर बोकील, नागेंद्र पाटील, संतोष बाचल, बापुलाल सुतार, शिवकुमार, मंजुषा पोतनीस, स्मता शेरकर, सुषमा बगाडे, मंजिरी दीक्षित, कविता शिवकुमार, इंद्रायणी कुलकर्णी हे गायक कलाकार कलाविष्कार सादर करणार आहेत.
कार्यक्रमास सचिन शेवडे यांची ध्वनी व्यवस्था लाभणार असून या रंगारंग कार्यक्रमाचे निवेदन अॅड.सपना डफळे करणार आहेत. सातारकर रसिक श्रोत्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुहाना सफर ग्रुपचे प्रमुख विजय साबळे यांनी केले आहे.