पौड – मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) पदाधिकार्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुणे येथील सर्किट हाऊस येथे भेट घेऊन मुळशी तालुक्यातील धरण भागातील रस्ते, विविध मागण्या, विकासकामांबाबत चर्चा केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कामांबाबत संबंधित अधिकार्यांना सूचना दिल्या.
मुळशी धरण भागात टाटा कंपनीने दरवर्षी पाच किलोमीटर रस्त्याचे काम करणे, धरण भागातील विद्युतयंत्रणेत सुधारणा करणे, तसेच सीएसआर निधीतून करायची कामे गेले अनेक महिने मुळशी पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने प्रभारी अधिकार्यांमार्फत कारभार झाकण्यात येत आहे. नागरिकांची पंचायत समिती स्तरावरील अनेक कामे खोळंबली आहेत. पंचायत समितीला पूर्णवेळ गटविकास अधिकारी तातडीने मिळणे गरजेचे आहे. पिरंगुट घाटात तीव्र उतारामुळे होणारे अपघात कमी करणे आदी कामांबाबत चर्चा केली.
यावेळी टाटा पॉवर कंपनीचे बसवराज मुन्नोळी, राष्ट्रवादीचे युवा नेते राजाभाऊ हगवणे, मुळशी तालुकाध्यक्ष अंकुश मोरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, कोंढवळेच्या सरपंच पल्लवी कंधारे, उपसरपंच नीलेश धनावडे, युवा कार्यकर्ते सुशिल हगवणे, माऊली कांबळे, दिनेश कंधारे, संतोष पोकळे, सुजाता अंकुश मराठे उपस्थित होते.