डॉ. अरुणा बर्गे; मालगाव-अंबवडे रस्त्याचे भूमिपूजन
शिवथर – मालगावसाठी आमदार महेश शिंदे यांनी भरघोस निधी दिला आहे. त्यामुळे गाव प्रगतिपथाकडे वाटचाल करत असल्याचे मत डॉ. अरुणा बर्गे यांनी व्यक्त केले.
मालगाव-अंबवडे ग्रामीण मार्गाचे भूमिपूजन मालगाव (ता. सातारा) येथे नुकतेच झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मानसिंग शिंगटे, अरुण कदम, सरपंच दीपाली गोडसे, भाजप तालुका उपाध्यक्ष अण्णा शिंदे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष उत्तम शिंदे, राहुल पवार, सचिन पाटील, युवराज साबळे, सागर पवार, सागर भोसले, ग्रामपंचायत सदस्य वैभव कदम, समीर कदम, दीपाली कदम, अश्विनी कदम, रेखा आवळे, विनोद गोडसे,
तंटामुक्ती समिती अध्यक्ष राजेंद्र कदम, अमर कदम, नितीन कदम, अनंत शिंगटे, गिरीश आवळे, नामदेव कदम, ऋत्विक कदम, संकेत कदम, अतुल कदम, सुनील कदम, देवा कदम आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. बर्गे म्हणाल्या, मालगाव-अंबवडे ग्रामीण मार्गासाठी 15 लाख रुपये मंजूर करून, कामाचा शुभारंभ लगेचच झाला आहे. यापूर्वी गावांना पाच वर्षांत काही लाखांचा निधी मिळायचा. आता एका वर्षात कोट्यवधींचा निधी मिळत आहे. मालगावसाठी आतापर्यंत सहा कोटी रुपये निधी मिळाला आहे. मतदारसंघात या पाच वर्षांमध्ये विकास होत आहे.
पुढील पाच वर्षांत युवकांना रोजगार देण्याचे काम आ. शिंदे करणार आहेत. अमित कदम यांनी सूत्रसंचालन केले. उपसरपंच शरद कदम यांनी प्रास्ताविक केले. राजकुमार कदम यांनी आभार मानले.