सातारा – सातार्यात महामार्गावर अंजठा चौक पुलावर दोन ट्रकच्यामध्ये सापडून एका कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. हा अपघात पाहणार्यांच्या काळजाचा ठोकाच चुकलाा होता. मात्र, कारमधील प्रवाशांना फारसे काही लागले नव्हते. सुदैवाने त्यांचे नशीब बलवत्तर होते म्हणूनच ते वाचले अशा प्रतिक्रिया अपघात पाहणार्यांकडून व्यक्त होत्या. या अपघातामुळे दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
येथील अजंठा चौकातील उड्डाणपुलावर दोन माल ट्रक आणि एक स्विफ्ट डिझायर कार यांचा तिहेरी अपघात होऊन दोघेजण किरकोळ जखमी झाले. सायंकाळी पावणे पाचच्या दरम्यान ही घटना घडली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. अजंठा चौकातील उड्डाण पुलावर दोन ट्रक एकापाठोपाठ चालले असताना त्या पाठीमागून येणार्या स्विफ्ट डिझायरने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन ट्रकच्यामध्ये डिझायर कार अडकून या कारचे प्रचंड मोठे नुकसान झाले. या अपघातामध्ये ट्रकचे किरकोळ नुकसान झाले असले तरी कारचालक सुदैवाने या अपघातातून बचावला अन्य एकजण यामध्ये किरकोळ जखमी झाला.
या अपघातात कारचा अक्षरशा चेंदामेंदा झाला घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. डिझायर कार कोल्हापूरवरून आल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, तक्रारच नसल्यामुळे या अपघाताची शहर पोलीस ठाण्यात झालेली नव्हती.