खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टीका
कोरेगाव – कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी रविवारी प्रथमच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी खा. सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले.
अंबवडे संमत कोरेगाव येथे दहा दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात खा. सुप्रिया सुळे यांनी आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना आ. महेश शिंदे यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. वाठार स्टेशन आणि भाडळे- किन्हई खोरे जोडणाऱ्या नलवडेवाडी- तळिये रस्त्याला नुकतीच मंजुरी मिळाली असून त्याचा शुभारंभ आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत प्रमुख मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी खा. सुप्रिया सुळे व आ. शशिकांत शिंदे यांच्यावर टीका केली.
खा. सुप्रिया सुळे यांच्याविषयी ते म्हणाले की, ताई ज्यांना गाडीत घेऊन फिरवतात, त्यांनी सामान्य जनतेला किती लुटले आहे, हे पहिले पाहण्याची गरज आहे. आम्ही कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी आणतो. त्यांना तो निधी आणता येत नव्हता, याचा त्रास होत आहे, असा टोला त्यांनी लगावला. कोरेगाव तालुक्याच्या विकासकामाला अडसर ठरणारा दगड हा 2019 मध्ये कोरेगाव तालुक्यातील शेतकरी व सुज्ञ जनतेने हुमगाव व वाशी येथील बांधावर नेऊन टाकला आहे,
आता तो दगड पुन्हा घरंगळत येऊ शकत नाही. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होऊ लागली आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने कोरेगाव, खटाव तालुक्यामध्ये तात्काळ दुष्काळ जाहीर करावा : आ. शशिकांत शिंदे कोरेगाव, खटावसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.