सासवड -सासवड शहरात लॉकडाऊन झाल्यापासून धान्य बाजार बंद करण्यात आला होता. मात्र, आता शहर अनलॉक झाल्याने बुधवार (दि. 5) पासून धान्य बाजार पुन्हा सुरु करण्यात होणार असल्याची माहिती नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मिलिंद जगताप यांनी दिली.
शेतकऱ्यांनी धान्य माल बुधवारपासून बाजारात आणावा, असे आवाहन सभापती मुरलीधर ठोंबरे यांनी केले आहे.