सारा अली खानची मैत्रिण अनन्या पांडेचा “स्टुडंट ऑफ द इयर 2′ नुकताच रिलीज झाला. अनन्याच्या आग्रहामुळे स्क्रीनिंगसाठी गेलेल्या सारा अली खानला हा सिनेमा निम्म्यातूनच सोडून निघून यावे लागले. कारण या स्क्रीनिंगच्यावेळी सारा अली खानला तिचा पूर्वीचा बॉयफ्रेन्ड भेटला होता.
सारा स्क्रीनिंगला गेली होती, पण अनन्याच्या गेस्ट लीस्टमध्ये कोण कोण आहे, हे तिला माहिती नव्हते. स्क्रीनिंगच्या ठिकाणी तिने माजी बॉयफ्रेन्ड वीर पहारियाला बघितले आणि तिचा मूडच गेला. ती थोडावेळ स्क्रीनिंगला थांबली आणि मध्येच उठून अनन्याला बाय म्हणून तडक निघून गेली. जाण्यापूर्वी सारा आणि वीरने एकमेकांना बघितले आणि जेमतेम हाय-बाय एवढेच बोलणे झाले. वीर पहारिया हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिल कुमार शिंदे यांचा नातू आहे.
वीरबाबतच्या रिलेशनशीपबाबत साराने एका इंटरव्ह्यूमध्ये थोडे स्पष्टिकरण दिले होते. आपण यापूर्वी एकदा रिलेशनशीपमध्ये राहिल्याचे आणि त्या बॉयफ्रेन्डचे नाव वीर पहारिया असल्याचे तिने सांगितले होते. ब्रेक अप होण्याचे कारण मात्र तिने स्पष्टपणे सांगितले नाही. बस्स हे नाते टिकू शकले नाही, असे ती म्हणाली.