Sara Netanyahu : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची पत्नी सारा नेतान्याहू यांनी पोप फ्रान्सिस यांना इस्रायल आणि गाझा यांच्यात सुरु असणाऱ्या युद्धात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. सारा यांनी पोपला ओलीस ठेवलेल्या लोकांना कोणत्याही अटी शिवाय सोडण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.
सारा नेतान्याहूने पोप फ्रान्सिसला एक पत्र लिहिले ज्यामध्ये हमासच्या दहशतीचा उल्लेख आहे. त्यांनी लिहिले की, “हमासच्या सैनिकांनी निर्दोष नागरिकांना ठार मारले आहे आणि नवजात मुलांनी जाळले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी पत्रात महिलांवरील बलात्काराचा उल्लेखही केला आहे.
सारा म्हणाल्या की, “यहुद्यांच्या हत्याकांडानंतर (हिटलरच्या राजवटीदरम्यान) हा सर्वात मोठा प्रलय आहे. पुढे साराने,”७८ दिवसांच्या अत्याचारानंतरही हमासने १२९ पुरुष, स्त्रिया आणि मुलांना ओलिस ठेवले आहे. त्यापैकी बरेच जण जखमी झाले आहेत आणि आजारी आहेत. ते उपासमारीने ग्रस्त आहे आणि काहीजण जगण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत औषधांनी वंचित आहे. ” अशी माहिती त्यांनी पत्रात नमूद केली केली.
साराने नोआ अर्गामेनी नावाच्या ओलिसाचा उल्लेख करत ऑक्टोबर रोजी हमास हल्ल्यात त्याचे अपहरण झाले. साराने शेअर केले की नोआ चीआई ब्रेन कॅन्सरशी झगडत आहे आणि तिला तिच्या मुलीला भेटण्याची इच्छा होती.
सारा म्हणाली, “मी तुम्हाला (पोप फ्रान्सिस) या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करावा आणि बंधकांना सोडण्यासाठी आपला प्रभाव वापरावा अशी विनंती करते.”असे म्हणत त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली.
गाझा येथील हमास-प्रशासित आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, मध्य गाझा येथील अल-मागाजी छावणीवर इस्त्रायली हल्ल्यामुळे 70 लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर, इस्रायलवर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.