मुंबई – सारा अली खानला भटकायला खूप आवडते. त्यामुळे ती आता पुन्हाएकदा आई अमृता सिंगबरोबर मालदीवला रवाना झाली आहे. जनता कर्फ्यू लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ती एअरपोर्टवर दिसली होती.
याच आठवड्यात सारा काश्मीरवरून परतली आहे. जानेवारी महिन्यातच ती, अमृता सिंग आणि साराचा भाऊ इब्राहिम मालदीवला गेले होते.
आता साराला आपल्या आईबरोबर आणखीन थोडा वेळ घालवायचा असल्याने ती मालदीवला रवाना झाली आहे. मालदिवला पोहोचल्या पोहोचल्या साराने आपले फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायला सुरुवात केली आहे.
“अतरंगी रे’ मध्ये सारा धनुष आणि अक्षय कुमारबरोबर दिसणार आहे. 6 ऑगस्टला हा सिनेमा रिलीज होणार आहे. तोपर्यंत साराला सुटी एन्जॉय करायची आहे.