Entertainment : अभिनेता विकी कौशलचा (Vicky Kaushal) ‘सॅम बहादुर’ हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या विकी व्यस्त असल्याचे दिसत आहे. उद्या हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. काल निर्मात्यांकडून चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कतरिना कैफसोबत (Katrina Kaif) विकी कौशलच्या आई -वडीलांनीही हजेरी लावली होती. त्यादरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगसाठी कतरिना कैफने ब्लॅक कलरच्या ऑफ-शोल्डर ड्रेसमध्ये तर विकी सुद्धा ब्लॅक कलरच्या शर्ट, पँट आणि कोटमध्ये दिसला होता. यावेळी कतरिना सासू- सासऱ्यांची विशेष काळजी घेताना पाहायला मिळाली. तिच्या ह्याच कृतीने सर्वांची मन जिंकली आहेत. त्याच्या या कृतीचे साऱ्यांनी कौतुक केले आहे. यावेळी नेटकऱ्यांनी कतरिनाला ‘संस्कारी बहु’ म्हणून तिचे कौतुक केले आहे. यापूर्वी देखील अनेकदा मॉडर्न कतरिना संस्कार जपताना दिसली आहे.
View this post on Instagram
तर, दुसरीकडे विकी कौशलचे देखील नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. विकीचे वडील शाम कौशल, आई वीणा कौशल येताच तोत्यांच्या पाया पडतो. तर भाऊ सनी कौशलला मिठी मारत असल्याचे व्हायरल व्हिडिओत दिसते. विकी कौशलच्या या कृत्याने चाहत्यांचे मने जिंकली. ‘सॅम बहादुर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला, विद्या बालन, सिद्धार्थ रॉय कपूर, करण जोहर, अभिषेक बच्चनसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
या सिनेमात विकीने फील्ड मार्शल सॅम मानेक शॉ यांची भूमिका साकारली आहे. तर फातिमा सना शेख या सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत आहे. अखेर हा चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.