Assembly Elections 2023 : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. 119 जागांवर मतदान होत आहे. या निवडणुकीत 2290 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहणार आहे.
संपूर्ण राज्यातील लोक मोठ्या संख्येने मतदानासाठी येत आहेत. अशात टॉलिवूड स्टार्सनेही मतदान केले आहे. आपल्या मतांचा योग्य वापर करण्यासाठी टॉलिवूड स्टार्सही मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करत आहेत. या यादीत अनेक दिग्गज स्टार्सचाही समावेश आहे. या स्टार्सचे फोटो आणि व्हिडिओही समोर येत आहेत.
#WATCH हैदराबाद: तेलंगाना विधानसभा चुनाव के लिए अभिनेता अल्लू अर्जुन जुबली हिल्स इलाके में मतदान करने पहुंचे।#TelanganaElections2023 pic.twitter.com/Y9Yqw2Cu8C
— ANI_HindiNews (@AHindinews) November 30, 2023
चिरंजीवी यांनीही कुटुंबासह केले मतदान
टॉलिवूडचा मेगास्टार चिरंजीवीनेही कुटुंबासह मतदान केले. चिरंजीवी पत्नी सुरेखा आणि धाकटी मुलगी श्रीशासोबत दिसले. चिरंजीवी यांनी रांगेत उभे राहून मतदान केले. यावेळी तो शूजशिवाय दिसला. अय्यप्पाच्या दर्शनासाठी घातलेला पोशाख त्यांनी परिधान केला होता.
अल्लू अर्जुनने केले मतदान
‘पुष्पा’ फेम राष्ट्रीय पुरस्कार विजेता आणि अभिनेता अल्लू अर्जुन तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी हैदराबादच्या जुबली हिल्स भागात मतदान करण्यासाठी पोहोचला. सर्वसामान्यांप्रमाणे अल्लू अर्जुनही रांगेत उभा होता. यादरम्यान तो शेजारी उभ्या असलेल्या लोकांशी बोलतानाही दिसला. “मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्ही या आणि जबाबदारीने मतदान करा,” असे अल्लुअर्जुनने हैदराबादमध्ये मतदान केल्यानंतर सांगितले.
#WATCH | Telangana Elections | Actor Jr NTR and his family arrive to cast their votes at the polling booth in P Obul Reddy Public School in Hyderabad. pic.twitter.com/UpVO6lgFwv
— ANI (@ANI) November 30, 2023
जूनियर एनटीआर यांनी केले ‘मतदान’
त्याचवेळी ‘आरआरआर’ फेम ज्युनियर एनटीआरही मतदान करण्यासाठी आले. ज्युनियर एनटीआरसोबत त्याची पत्नी आणि आईही दिसली. तिघेही मतदान केंद्रावर पोहोचले आणि रांगेत उभे राहून मतदानाची पाळी येण्याची वाट पाहत होते. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.