मुंबई – महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर आमचे प्रेम आहे आणि त्यांचेही आमच्यावर प्रेम आहे. त्यामुळे ते 12 सदस्यांची नावे नाकरणार नाहीत, अशी खोचक प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले कि, राज्यपाल हे सुज्ञ आहे. राज्यपालांवर आमचे प्रेम आहे आणि त्यांचेही आमच्यावर प्रेम आहे. ते किती प्रेम आहे हे देशाला माहिती आहे आणि या प्रेमातून सर्व कारभार सुरळीत होईल. आम्ही राज्यपालांचा नेहमी आदर करतो. राज्यपाल घटनाबाह्य काम करणार नाहीत. ते 12 जणांची यादी नाकारणार नाहीत.
राज्यपालांचे जे मत आहे, त्या मताचा आदर आम्ही नेहमी करतो. शेवटी कॅबिनेटचा निर्णयाचे पालन राज्यपालांना करावा लागतो. राज्य सरकारने जी यादी पाठवली आहे, ती घटनेच्या आधारे पाठवली आहे. राज्य सरकारने कधीही घटनाबाह्य काम केले नाही आणि करणारही नाही, असेही राऊत म्हणाले आहेत.
अभिनेत्री उर्मिला मातोडकरांविषयी प्रश्नावर संजय राऊत म्हणाले कि, उर्मिलासारखी स्पष्टवक्ता, देशासह महाराष्ट्राच्या घडामोडींची माहिती असणारी अभिनेत्री जर संसदेत जाईल, तर त्याचा निश्चितच फायदा होईल, अशी आशा संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.