Sanjay Mandalika | Shahu Maharaj – कोल्हापूरच्या गादीवर ज्या पद्धतीने शाहू महाराज आले तसा राजहट्ट या लोकसभेच्या निवडणुकीत देखील आहे. पण सगळे राजहट्ट कोल्हापूरची जनता पूर्ण करणार नाही.
कुस्तीच्या आखाड्यात ज्या पद्धतीने डाव टाकला जातो, टांग मारली पाहिजे, अंगावर माती टाकली पाहिजे त्यापद्धतीने सगळे होणार आहे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी केला. । Sanjay Mandalika | Shahu Maharaj
मंडलिक पुढे म्हणाले की, सतेज पाटील तुम्हाला आताच मी चुकीचा कसा वाटायला लागलो? 2026 पर्यंत संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली हा जिल्हा विकास करेल असे म्हटला होता ना. तुम्हालाच निवडणुकीला उभा राहायला लागणार म्हटल्यानंतर तुम्ही राजकीय बळी शोधला आणि शाहू महाराज यांना गळ घातली.
कोल्हापूरमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप नेते चंद्रकांत पाटील,
खासदार धनंजय महाडिक, शिंदे गटाचे नेते राजेश क्षीरसागर, भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे हे उपस्थित होते. महायुतीच्या तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अबकी बार चारसो पार हा निर्धार करण्यात आला.
आखाड्यात टीकेला प्रत्युत्तर मिळणारच… । Sanjay Mandalika | Shahu Maharaj
शाहू महाराजांनी सगळ्यात महत्त्वाचे काम केले ते म्हणजे प्रत्येक घरात पुरोगामी विचार दिला. आता निवडणुकीला उभा राहिलेल्या वारसदाराने देखील सांगितले पाहिजे त्यांनी काय काम केले. थेट पाईपलाईनचे पाणी आणले म्हणतात संपूर्ण कोल्हापूरकर म्हणत आहेत एकट्यानेच अभ्यंग स्नान केले का?,
आम्हाला देखील कुणावर टीका करण्यात रस नाही. मात्र, निवडणुकीच्या आखाड्यात आल्यानंतर समोरून वार झाले तर आम्ही देखील कोल्हापूरकर आहोत. हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.