मुंबई – शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे गट पडल्यापासून खासदार संजय राऊत हे शिंदे गटाला डिवचण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सत्ता संघर्षांचा निवाडा करण्यासाठी ते प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यापासून राऊत हे अधिक आक्रमतेने ठाकरे गटासह भाजपवर टीका करताना दिसून येतात. नुकतंच राऊत यांनी शिंदे गट म्हणजे भाजपने पाळलेला कोंबड्यांचा खुराडा असल्याचे म्हणत जोरदार टीका केली.
यावर आता शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी प्रतिउत्तर दिल आहे,’संजय राऊत सारखा आमच्यावर टीका करतो. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, नागपूरमध्ये कुठेही सांग. एकदा जरा समोरासमोर होऊनच जाऊदे, संजय राऊत यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. संजय राऊत कसा नौटंकी आहे. हे सिद्ध करून दाखवतो असं आव्हान गायकवाड यांनी संजय राऊत यांना दिले आहे.
आमदार संजय गायकवाड म्हणाले की, आत्ता आम्हाला ५ जागा मिळणार आहे की २२, आम्ही किती लढवायचं आहे, तो आमचा पक्ष आहे ना. तू चोमडेगिरी कशाला करतो. हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्या वाट्याला काय देणार हे प्रकाश आंबेडकर बोलले. महाविकास आघाडीपासून सावध राहण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला माना. तुमची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसमोर काय औकात ठेवणार आहे ते पहा जरा असं त्यांनी म्हटलं आहे.