मुंबई – महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या जंयतीनिमित्त त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुखने खास पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या भावनिक पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.रितेशने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यावेळी त्याने त्याच्या दोन मुलांचे फोटो शेअर केले आहेत. यातील एका फोटोत त्याची दोन्हीही मुलं विलासराव देशमुख यांच्या पुतळ्यासमोर उभी असल्याचे दिसत आहे.
“माझ्या खडतर काळात जेव्हा मला हताश, पराभूत झाल्यासारखं वाटतं, त्यावेळी मी विचार करतो की मी कुणाचा मुलगा आहे… या एकाच विचाराने मी पुन्हा एकदा जग जिंकण्यासाठी सज्ज होतो… वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बाबा… तुमची दररोज आठवण येते”, असे रितेशने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
View this post on Instagram
रितेशची पत्नी जिनिलीयाने देखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन विलासराव देशमुख यांचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रितेश व जिनिलीयाची दोन मुलं त्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. “काही व्यक्ती तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पापा….” असे जिनिलीयाने पोस्टमध्ये लिहिले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, मागील वर्षी देखील वडील विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रितेशने भावनिक पोस्ट लिहिली होती. ‘मला तुम्हाला मिठी मारायची आहे. मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. मला तुम्हाला हसताना बघायचं आहे. मला तो क्षण पाहायचा आहे, जेव्हा तुम्ही माझ्या पाठिवर हात ठेवून म्हणता की, मी तुझ्या कायमसोबत आहे. मला तुमचा हात पकडून चालायचं आहे. मला तुमच्यासोबत खेळायचं आहे. हॅप्पी बर्थ-डे पप्पा, मला तुमची आठवण येते.’ अशी भावनिक पोस्ट रितेशने शेअर केली होती.