मुंबई – अभिनेता संजय दत्त आणि त्याची पत्नी मान्यता यांनी नुकताच आपल्या लग्नाचा पंधरावा वाढदिवस साजरा केला. या पार्टी दरम्यानचा मान्यता आणि संजय दत्त या दोघांचा एक व्हिडोओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघेही डान्स करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर दोघांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय.
‘तुम साथ हो जब अपने’ या अमिताभ बच्चन यांच्या गाण्यावर संजय आणि मान्यताने रोमँटिक डान्स केला आहे. संजय दत्तचे हे तिसरे लग्न असून त्याच्या लग्नाला पंधरा वर्ष पूर्ण झाली आहेत.यानिमित्त दोघांनीही गाण्याच्या तालावर ठेका धरत डान्स केला आहे. मान्यताने हा व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
हा व्हिडीओ शेअर करत मान्यता लिहिते, “एकवीस वर्षे झाली.. आम्ही चुका केल्या, आम्ही माफी मागितली, एकमेकांना दुसरी संधीही दिली आम्ही मस्तीही केली. आम्ही खूप रागावलो, आम्ही हिंमतही ठेवली आणि प्रेमही केलं. लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा !” मान्यताने शेअर केलेल्या या व्हिडिओवर अनेक बॉलिवूड कलारांनी कमेंट्स केल्या आहेत.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी मात्र संजय दत्तला या व्हिडीओवरून ट्रोल केले आहे. युजरने व्हिडिओमधील संजय दत्तच्या वागणुकीवरून देखील कमेंट केल्या आहेत. याने चिडून धक्का दिला आहे अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर दुसऱ्याने कमेंट करत दोघेही ओव्हर रोमँटिक वाटत असल्याचे म्हंटले आहे. तर एकाने बाबा जास्त झाली का ? असा सवाल कमेंटद्वारे विचारला आहे.