मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोमधील तिच्या हॉट लूक आणि अदाकारी चाहत्यांना मोहिनी घालणारी आहे. नेहमी आपले फोटो त्रिशाला सोशल मीडियावर शेअर करत असते.
बॉलिवूडपासून त्रिशाला लांब आहे. त्रिशाला चित्रपटात काम करण्यास इच्छुक नाही. मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्रिशाला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
ती इन्स्टाग्रामवर सतत आपले फोटो शेअर करत असते. यातच तिने पुन्हा एकदा तिने इन्स्टाग्रामवर फोटो लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या फोटोत बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेता सुनील दत्त यांच्या सोबत ती खेळताना दिसत आहे. सध्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळतं आहे.
दरम्यान, तिचे इन्स्टाग्रामवर 2 लाख 84 हजार फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर तिच्या फोटोला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जाते. नेहमीच लाइमलाईटमध्ये राहणारी त्रिशाला संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माची मुलगी आहे. त्रिशाला नेहमी आपली मत बिनधास्तपणे सर्वांसमोर मांडते. त्रिशाला अभिनेत्री नसली तरी, तिच्या ग्लॅमरस लूकची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा होत असते.
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा