नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह विधान करणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला असल्याचे समोर आले आहे. या व्हिडिओमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलचे आक्षेपार्ह विधान करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हमारा प्रसाद असं आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
हमारा प्रसाद या व्यक्तीने एक व्हिडीओ रेकॉर्ड करून ट्विटरवर शेअर केला होता. या व्हिडीओत त्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य केली होती. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. हा सर्व प्रकार तेलंगणामध्ये घडला आहे.
ఒక వైపు ఓట్ల కోసం రోజూ అంబేద్కర్ జపం చేస్తున్న @BRSparty ఈ హమారాప్రసాద్ లాంటి మూర్ఖులు ‘బాబాసాహెబ్ బతికుంటే కాల్చి చంపేవాడిని’ అని కోట్లాది మంది మనోభావాలు దెబ్బతీసినా మీరు ఎందుకు వీడిని IPC153A,PD Act కింద జైలులో పెట్టడం లేదు?రాష్ట్రం అగ్నిగుండం అయ్యే దాకా ఆగుతరా? pic.twitter.com/DfRZpEHi7O
— Dr.RS Praveen Kumar (@RSPraveenSwaero) February 9, 2023
तर ट्विटरवर पोस्ट केलेल्या व्हिडीओत हमारा प्रसाद याने हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले पुस्तक हातात घेतल्याचे दिसून येत आहे.
“आज जर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर ज्याप्रमाणे गोडसेने गांधींना ठार केलं त्याप्रमाणे मी बाबासाहेब आंबेडकर त्यांची हत्या केली असती,” असे धक्कादायक विधान हमारा प्रसाद याने केले आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ माजली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.