गेल्या अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सानिया मिर्झाने मागील काही दिवसांमध्ये अशा पोस्ट शेअर केल्या होत्या, ज्यावरून त्यांच्यामध्ये पारिवारिक संबंध बिघडले असल्याचे दिसत आहे. आता याच बातम्यांना दुजोरा देत सानिया आणि शोएबच्या जवळच्या मित्राने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. लवकरच दोघांमध्ये घटस्फोट होणार असून सध्या दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी सानिया दुबईत असून शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे.
सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटाचे खरे कारण आले समोर; ‘या’ माॅडेलच्या प्रेमात झाला होता गुल…
अलीकडेच सानिया मिर्झाने तिच्या भावना व्यक्त करत इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, जो चाहत्यांनी पाहिल्यानंतर त्यांच्या घटस्पोटाबाबत चर्चा सुरु झाली. मात्र आता त्यांच्या जवळच्या काही लोकांनी हे स्पष्ट केले आहे की, सानिया आणि शोएबच्या घटस्फोटाची बातमी खरीअसून ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. याबरोबरच सध्या ते एकमेकांपासून दूर राहणे पसंद करत आहेत. त्यांच्या घटस्फोटाची बातमी आल्याने चाहत्यांना दुःख झाले आहे.
काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने तिच्या मुलासोबतचा एक गोंडस फोटो देखील शेअर केला होता. ज्यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘हे प्रेमळ क्षण आपल्याला या कठीण दिवसातून बाहेर काढतात.’ सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. त्यानंतर आता १२ वर्ष संसार चालवल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. सानिया मिर्झा भारतीय टेनिस खेळाडू आहे. तिने भारताकडून मोठमोठ्या स्पर्धा खेळल्या आहेत. तर शोएब मलिक हा पाकिस्तानचा क्रिकेटर आहे. त्याने बराच काळ पाकिस्तान संघासाठी क्रिकेट खेळले आहे.