संगीता रेड्डी फिक्कीच्या अध्यक्षपदी

नवी दिल्ली : अपोलो हॉस्पिटल व्यवस्थापकीय संचालक संगीता रेड्डी यांनी देशातील प्रमुख उद्योग संस्था एफआयसीसीआय (Ficci)च्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. त्यांची २०१९-२० च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. संगीता रेड्डी यांनी एसआयएलचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संदीप सोमानी यांच्या जागेवर एफआयसीसीआयचे अध्यक्ष म्हणून निवड झाली .

वॉल्ट डिस्ने कंपनी एपीएसीचे अध्यक्ष आणि स्टार,डिस्ने इंडियाचे अध्यक्ष उदय शंकर हे वरिष्ठ उपाध्यक्ष असतील. तर हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड अध्यक्ष  संजीव मेहता यांची एफआयसीसीआयच्या नवीन उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.