मुंबई – करण जोहरचा ‘कुछ कुछ होता है’ चित्रपट चांगलाच गाजला. शाहरुख काजोलसह चित्रपटातील डायलॉग व काही पात्रे आजही आठवतात. 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाकडे आजही एव्हरग्रीन चित्रपट म्हणून पाहिले जाते. चित्रपटात दाखवण्यात आलेली ट्रँगल लव्हस्टोरी प्रेक्षकांना चांगलीच आवडली. त्यासह आवडले चित्रपटातील सर्वच बालकलाकार. जे आज खूप मोठे झाले आहेत. सना सईद हे त्यातीलच एक नाव.
सना सईद म्हंटल की डोळ्यासमोर येते ती नटखट छोटी अंजली. कुछ कुछ होता है मध्ये राणी मुखर्जीची मुलगी बनलेली सना आता खूप मोठी झाली आहे. सना आपल्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.तिचे बोल्ड फोटो पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही ही तीच अंजली आहे का ? मात्र हे खरं आहे. सनाने आपल्या इंस्टाग्रामवरून नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामुळे अनेकांना विश्वास ठेवणं कठीण जात आहे की ही तीच बालकलाकार अंजली आहे.
सना सईद आता 34 वर्षांची झाली आहे, पण तिला हवी तशी लोकप्रियता मिळाली नाही. एक-दोन चित्रपटांव्यतिरिक्त ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसली होती, पण असे असूनही तिला अपेक्षित यश मिळाले नाही.त्यामुळे सनाचा स्ट्रगल अद्याप सुरूच आहे.
View this post on Instagram
सनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती काळ्या लेदरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. यावेळेसचा सनाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना देखील चांगलाच आवडला आहे. अनेकांनी तिच्या या बदलत्या लूकबाबत तिचे कौतुक केले आहे तर काहींनी तिला लहानपणीच गेटअप चांगला असलयाचे म्हंटले आहे. सनाने नुकतीच तिचा बॉयफ्रेंड सबा वॅगनरसोबत एंगेजमेंट केली आहे.