मुंबई – आजवर चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपटांची निर्मिती झाली. या चित्रपटांच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. तर काही चित्रपटातून प्रेमकथा उलगडण्यात आल्या. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे करण जोहर दिग्दर्शित ‘कुछ कुछ होता है’. 90 च्या दशकात आलेल्या या चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान आहे.
https://www.instagram.com/p/CFuN6f_JNAJ/?utm_source=ig_web_copy_link
या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. शाहरुख खान, रानी मुखर्जी आणि काजोल यांच्या व्यतिरिक्त जर कोणी प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली असले तर ती म्हणजे, ‘परजान दस्तूर’ने त्याने एका डायलॉगने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली होती. ‘तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ’ त्याचा हा डायलॉग आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.
कुछ कुछ होता है या चित्रपटामुळे या बालकलाकाराचा स्टारडम प्रचंड वाढला. आता बालकलाकार मोठा झाला असून परजान फेब्रुवारी 2021 मध्ये लग्न बंधनात अडकणार आहे. परजानने इंस्टाग्रामवर गर्लफ्रेंड डेलना श्रॉफसोबतचा फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. “तू एक वर्षापूर्वी हो म्हणाली होतीस. आता ४ महिन्यांनंतर लग्न’ असं कॅप्शन परजानने दिलं आहे.